पुणे : मेट्रो कामगाराच्या मृत्युप्रकरणात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रस्त्यावर मेट्रोसाठी सिमेंटचे खांब उभारण्याचे मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. दरम्यान, बंडगार्डन मेट्रो स्थानकातील सिमेंटच्या खांबावर बसविण्यात आलेले नटबोल्ट काढण्याचे काम 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा अभिनंदनकुमार करीत होता. अभिनंदनकुमार हा आठ ते दहा मीटर उंचीवरुन काम करीत होता. त्यावेळी काम करताना आवश्‍यक सुरक्षिततेसाठीची साधने देण्यात आली नव्हती, तसेच काम करण्याच्या ठिकाणी सेफ्टी नेटही बसविलेले नव्हते.

पुणे : मेट्रोच्या 10 मीटर उंचीवरील सिमेंटच्या खांबाला बसविलेले नटबोल्ट काढताना कामगाराचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यु झाला. कामगाराच्या मृत्युस जबाबदार असल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनंदनकुमार नंदकिशोर रमाणी (वय 23 , रा.नागपूर चाळ, येरवडा) असे या घटनेत मृत्यु झालेल्या कामगारचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मनीषा टुले यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन ठेकेदार विनयकुमार ओमप्रकाश सिंग (वय 22 , रा.टिंगरेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रस्त्यावर मेट्रोसाठी सिमेंटचे खांब उभारण्याचे मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. दरम्यान, बंडगार्डन मेट्रो स्थानकातील सिमेंटच्या खांबावर बसविण्यात आलेले नटबोल्ट काढण्याचे काम 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा अभिनंदनकुमार करीत होता. अभिनंदनकुमार हा आठ ते दहा मीटर उंचीवरुन काम करीत होता. त्यावेळी काम करताना आवश्‍यक सुरक्षिततेसाठीची साधने देण्यात आली नव्हती, तसेच काम करण्याच्या ठिकाणी सेफ्टी नेटही बसविलेले नव्हते.

गर्द झाडीत जमिनीत खड्डा खणून बहाद्दरांनी सुरू केला अवैध व्यवसाय

त्यावेळी काम करीत असताना अभिनंनंकुमारचा तोल जाऊन तो खाली पडला. या अपघातात त्यास गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. तेव्हा, तपासात ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचजे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भागवत शेंडगे तपास करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case filed against contractor in Metro workers death case in pune