शिवाजी महाराजांचे वादग्रस्त चित्र काढणाऱ्याविरोधात तक्रार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

जुवाटकर यांच्यासह शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील व शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्रिगेडने केली आहे.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वादग्रस्त चित्र काढल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडतर्फे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चित्रकार सचिन जुवाटकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जुवाटकर यांच्यासह शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील व शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्रिगेडने केली आहे.

मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या चित्र प्रदर्शनामध्ये जुवाटकर यांनी काढलेले शिवाजी महाराज यांचे वादग्रस्त चित्र ठेवण्यात आले होते. याप्रकरणी जुवाटकर यांच्यावर टिका करण्यात आली होती. या पार्श्वभुमीवर मंगळवारी संभाजी ब्रिगेडने जुवाटकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. ठाकरे, राऊत, पाटील व  पुरंदरे यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.

Web Title: case filed against Shivaji Maharajs controversial picture in Pune