esakal | Coronavirus : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत 'त्यांनी' सुरू ठेवली हॉटेल; मग...!
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

सहाही हॉटेल चालकांनी आदेशाचे उल्लंघन करत आपले हॉटेल सुरू ठेवून नागरिकांना खाद्य पदार्थांची विक्री करत होते. त्यामुळे गर्दी निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Coronavirus : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत 'त्यांनी' सुरू ठेवली हॉटेल; मग...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Coronavirus : कामशेत : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजारपेठा, महाविद्यालये आदी गर्दीची ठिकाणे शुक्रवार (दि. २०) ते रविवार (दि.२२) या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असे असतानादेखील कामशेत हद्दीतील सहा हॉटेल चालकांनी आदेशाचे उल्लंघन करून हॉटेल सुरू ठेवली. याप्रकरणी त्यांच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार (दि.२१) रोजी चार ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस नाईक वैभव मारुती सकपाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

- Videos : 'वी आर वन, वी हॅव वॉन'; कोरोना योद्ध्यांना दिग्गजांचे अभिवादन!

राजमहमंद बाबूलाल सय्यद (वय ४५ रा. कडधे, ता. मावळ), अविनाश परशुराम मानकर (वय २२ रा. कडधे), शनिनाथ उर्फ सनी बबन शेंडगे (वय २३ रा. करूंज ), नसीम नईम महमंद (वय २१ रा. कडधे), सद्दाम आफिज खान (वय २८ रा. कामशेत), अंकुश गणपत ठोंबरे (वय ४० रा. बऊर ता. मावळ) अशी गुन्हा दाखल केलेल्या हॉटेल मालकांची नावे आहेत.

- बुलाती है मगर जाने का नै, ये दुनिया है, इधर जाने का नै!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शासनाकडून कलम ४२७ /२०२० अन्वेय विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच अनुषंगाने शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील सर्व गर्दीची ठिकाणे, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करताना शनिवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे व पोलीस नाईक वैभव सकपाळ हे कामशेत हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

- कोरोना योद्ध्यांना पुणेकरांचा सलाम; थाळीनाद-शंखनादाने दुमदुमला परिसर!

यावेळी वरील सहाही हॉटेल चालकांनी आदेशाचे उल्लंघन करत आपले हॉटेल सुरू ठेवून नागरिकांना खाद्य पदार्थांची विक्री करत होते. त्यामुळे गर्दी निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी या सहा हॉटेल चालकांवर कडक कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा