पुणे - बनावट जातप्रमाणपत्र देणाऱ्या विद्यार्थ्यावर गुन्हा

संदीप घिसे 
शनिवार, 14 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) : एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश घेताना जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयात घडली. 

कार्तिक राजू श्रीवास (वय 21, रा. तुकाराम नगर, कन्हाण, नागपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयाचे संचालक डॉ. राकेश उषाकांत ढोलकिया (वय 59, रा.ग्लोरिया सोसायटी, बावधन) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक निरीक्षक गजानन कडाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक याने 2017-18 या वर्षीच्या एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाकरिता पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयात प्रवेश केला घेतला होता. त्यावेळी त्याने सादर केलेल्या जात प्रमाणपत्र महाविद्यालयाने पडताळणी करिता नागपूर येथे पाठविले. मात्र आपण असे कोणतेही प्रमाणपत्र दिलेले नसल्याचे उपजिल्हाधिकारी नागपूर यांनी कळविले. त्यानुसार बनावट कागदपत्र सादर करून महाविद्यालय व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: case filed against student for fake caste providing