हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल; निवडणुक आयोगाने घेतली गंभीर दखल: Kasba Bypoll Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election

Kasba Bypoll Election: हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल; निवडणुक आयोगाने घेतली गंभीर दखल

कसबा विधानसभा पोट निवडणुकीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रासने यांच्यावर मतदान केंद्रात भाजपच उपरण घालून गेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (case has been registered against Hemant Rasane BJP candidate for the Kasba Assembly by election )

काल कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यावेळी हेमंत रासने यांनी भाजपचे अधिकृत चिन्ह असलेले कमळचे उपरन गळ्यात घालून मतदान केले होते. यावरूनच आता निवडणूक आयोगाकडून रासने यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठीचे मतदान समाप्त; जाणून घ्या, कुठे किती टक्के मतदान झाले

निवडणूक प्रचार संपल्यानंतरही त्यांनी कमळाची पट्टी घालून प्रचार केल्याचे निदर्शनास आले. ही बाब गंभीर असून त्यावर निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच शिवसेना पुणे शहर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तक्रारी अर्जही दाखल करण्यात आला होता.

Kasba Bypoll Election : कसब्यात दुपारपर्यंत 'इतके' टक्के मतदान, मतदारांचा निरुत्साह कशामुळे?

ठाकरे गटाच्या नेत्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ही कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे रीतसर लेखी तक्रार केली होती.