मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याला अंत्यसंस्काराला घेऊन जाण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मोरे यांनी सोमवारी (ता. 7) वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन उदास यांच्या शासकीय गाडीच्या काचा फोडल्या होत्या. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात हा सर्व प्रकार घडला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनीषा झेंडे यांनी फिर्याद दिली होती.

पुणे: शासकीय वाहनाची तोडफोड करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) गटनेते वसंत मोरे यांच्यावर आज सकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आणि बेकायदेशीर जमाव केल्याच्या कलमांनुसार हा गुन्हा दाखल आहे.

अरे बापरे! भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याला अंत्यसंस्काराला घेऊन जाण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मोरे यांनी सोमवारी (ता. 7) वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन उदास यांच्या शासकीय गाडीच्या काचा फोडल्या होत्या. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात हा सर्व प्रकार घडला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनीषा झेंडे यांनी फिर्याद दिली होती.

पुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात

रुग्णांना रुग्णालयांत घेऊन जाण्यासाठी तसेच एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करायला नेण्यासाठी सध्या लवकर रुग्णवाहिका मिळत नाही. याच प्रकारामुळे चिडून जाऊन प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करीत मोरे यांनी ही तोडफोड केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर मोरे यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्यांच्यावतीने ऍड. गणेश म्हस्के आणि ऍड. सतीश कांबळे यांनी युक्तिवाद करीत जामीन देण्याची मागणी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जानवी केळकर यांनी त्यांना जामीन मंजूर केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against MNS group leader Vasant More