जोशात त्यांनी रुग्णालयात तोडफोड केली, पण आता...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

डॉक्‍टरांना धमकावून खासगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील वडगाव बुद्रूक भागात घडली होती. या प्रकरणी ओंकार नावाचा एक युवकासह त्याच्या बरोबर असलेल्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ः डॉक्‍टरांना धमकावून खासगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील वडगाव बुद्रूक भागात घडली होती. या प्रकरणी ओंकार नावाचा एक युवकासह त्याच्या बरोबर असलेल्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. पृथ्वीराज चव्हाण (वय 65) यांनी यासंदर्भात सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 12) रात्री साडेआठच्या सुमारास ओंकार डॉ. चव्हाण याच्या रुग्णालयात आला. त्याच्याबरोबर असलेले दोन साथीदार बाहेर थांबले होते. ओंकार याच्या करंगळीला दुखापत झाल्याने त्यातून रक्तस्राव होत होता. त्यावेळी डॉ. चव्हाण एका रुग्णाची तपासणी करत होते. ओंकारने तातडीने मलमपट्टी करा, असे डॉ. चव्हाण यांना सांगितले. मी एका रुग्णाची तपासणी करत आहेत. तपासणीनंतर लगेचच तुझ्यावर उपचार करतो, असे डॉ. चव्हाण यांनी त्याला सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यानंतर ओंकार बरोबर असलेल्या दोन साथीदारांनी डॉ. चव्हाण यांना शिवीगाळ करून धमकावण्यास सुरवात केली. रुग्णालयातील खिडकीच्या काचा कोयत्याने फोडून आरोपींनी डॉ. चव्हाण यांच्या केबीनची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आरोपी पसार झाले होते.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against three persons for vandalizing the hospital