Pune News : इंदापूर तालुक्यातील पळसदेवमधील अफूच्या शेतीप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

case registered against 6 persons opium cultivation Palasdev Indapur crime

Pune News : इंदापूर तालुक्यातील पळसदेवमधील अफूच्या शेतीप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील माळेवाडी परिसरातील सहा शेतकऱ्यांनी मका पिकामध्ये व्यावसायिक हेतूने तब्बल 7087 किलो वजनाची 1 कोटी 41 लाख 74 हजार रुपये किमतीची अफूची लागवड केल्याप्रकरणी संबंधितांवर एन.डी.पी.एस. कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

याबाबत इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार (ता.03) रोजी पळसदेव हद्दीतील माळेवाडी ता. इंदापुर जि. पुणे गावचे हदिदत जमीन गट नंबर 51/2, गट नंबर 166/ब, गट नंबर 166/2/ब, गट नंबर 2, गट नंबर 4, गट नंबर 26/1 मध्ये इसम नामे काशीनाथ रामभाऊ बनसुडे,

दत्तात्रय मारूती बनसुडे, राजाराम दगडु शेलार, लक्ष्मण सदाशिव बनसुडे, माधव मोतीराम बनसुडे, रामदास जगन्नाथ शिंदे (सर्व रा. माळेवाडी, पळसदेव ता. इंदापुर जि.पुणे) यांनी त्यांचे वरील शेतजमीनीमध्ये अफु या अंमली पदार्थाचे झाडांची थोड्या थोड्या अंतराने बेकायदेशीरपणे विनापरवाना व्यापारी व्यवसायीक हेतुने एकूण 7,087 किलो वजनाची एकुण किंमत 1,41,74,000 /- रूपये ची लागवड केलेली मिळुन आले आहे.

म्हणुन त्यांच्या विरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अन्वये सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने करीत आहेत.दरम्यान अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब, उत्पादन शुल्क निरीक्षक पोळ, तालुका कृषी अधिकारी यांनी घटनस्थळाला भेट दिली.

1)पोलिस ही अचंबित..

पोलिसांनी उजनी बॅकवॉटरलगत असलेल्या पळसदेव गावांतर्गत असलेल्या माळेवाडी, शेलारपट्टा परिसरातील काही शेतकऱ्यांनी थोड्या-थोड्या प्रमाणात अफूची लागवड केली आहे. याबाबत निनावी ऑनलाईन तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी गुरुवारी (ता.2) छापा मारला.दोन दिवस कारवाई चालली. येथील शेतकऱ्यांचा प्रताप पाहून पोलिसही अचंबित झाले होते.

2) फुलांचे रूपांतर अफूच्या बोंडात

या शेतकऱ्यांनी मका पिकामध्ये काही प्रमाणात अफूची लागवड केल्याचे आढळून आले. सध्या पिकाचा बहर सुरु झाला असून, फुलांचे रूपांतर अफूच्या बोंडामध्ये झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर अफू मजुरांच्या साह्याने काढणी केली. अफूची बोंडे पिशवीत भरण्यात आली. मजुरांकडून या पिकाची काढणी करण्यात आली.

3) अफूची शेतीने नष्ट

पळसदेव येथील अफू शेतीवर पोलिसांची धाड पडल्याची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर येथील अफू लागवड केलेल्या काहींनी रात्रीत शेतातील अफूच्या पिकावर रोटावेटर फिरवित शेती नष्ट केल्याची चर्चा या भागात आहे.शेतातील अफू पिकावर रोटावेटर फिरवून रात्रीचीच नवीन पीक पेरणी केल्याचे बोलले जात होते.यामुळे अशा शेतीची चौकशी होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.