छेडछाडीच्या प्रकरणावरून महिला, पुरुषांना मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

पुणे - महाविद्यालयाच्या परिसरात मुलीची छेडछाड केल्यावरून तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार भांडणाचा बदला घेण्यासाठी 30 ते 35 जणांच्या टोळक्‍याने घरामध्ये घुसून महिला, पुरुषांना जबर मारहाण केली. हा प्रकार लोहगाव येथील खेसे वस्ती येथे शनिवारी (ता. 22) सायंकाळी सातच्या सुमारास घडला. महिलांच्या अंगावरील पावणेदोन लाख रुपयांचे दागिनेही यामध्ये लंपास केले आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिवराज बाबासाहेब तापकीर, कुंडलिक तापकीर, गोट्या अरुण तापकीर, प्रणव ताम्हाणे, सुमित तापकीर, शशिकांत तापकीर, रणजित तापकीर, बाबासाहेब तापकीर (सर्व रा. चऱ्होली) यांच्यासह अन्य अज्ञात 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात एका 65 वर्षांच्या (रा. खेसे आळी, लोहगाव) महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी चऱ्होली रस्ता येथे अजिंक्‍य डी वाय पाटील महाविद्यालयाच्या जवळ एका तरुणीची छेडछाड काढल्यावरून मयूर खेसे याचे भांडण झाले होते. त्यामध्ये दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या भांडणाच्या रागातून बदला घेण्यासाठी तापकीर व त्याच्या टोळीने शनिवारी सायंकाळी हल्ला केला. दुचाकींवरून आलेल्या टोळक्‍याने दगडफेक करून घराच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली. पार्किंगमधील पाच गाड्यांची तोडफोड करून ते घरात घुसले. महिला व पुरुषांना हाताने व लाकडी दांडक्‍यांनी जबर मारहाण केली. महिलांचा विनयभंग करत त्यांना जमिनीवर ढकलून दिले. त्यांच्या कानातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास करून हे टोळके निघून गेले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश तोगरवाड करत आहेत. 

Web Title: the case of tampering, women and men beat