एक कोटी 11 लाखांच्या जुन्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पुणे - गुन्हे शाखेने शिवाजीनगर परिसरात छापा टाकून एक कोटी 11 लाख रुपये किमतीच्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांसह एकाला ताब्यात घेतले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर शहरात पहिल्यांदाच इतक्‍या मोठ्या प्रमाणावर रक्‍कम जप्त करण्यात आली आहे.

अंकेश अनंत अगरवाल (वय 24, रा. नवा बाजार, खडकी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून रिअल इस्टेट व्यवसायात आहे. अंकेश हा त्याच्याकडील एक कोटी 11 लाख रुपयांच्या हजार आणि पाचशेच्या नोटा 30 टक्‍के दराने अदला-बदल करून घेण्यासाठी महापालिकेजवळ नाकोडा कोर्ट इमारतीमध्ये किशोर शेषमल पोरवाल यांच्याकडे आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार शैलेश जगताप यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलेश जगताप, संतोष पागार, परवेज जमादार, राहुल घाडगे, प्रमोद गायकवाड, अजय भोसले आणि प्रवीण जाधव यांनी सायंकाळी छापा टाकला. त्या वेळी अंकेश याला या नोटा कोठून आल्या याची माहिती देता आली नाही. पोलिसांनी ही रक्‍कम ताब्यात घेऊन आयकर विभागाकडे सोपविली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर यापूर्वी कचरावेचक महिलेला डेक्‍कन येथील कचराकुंडीत 52 हजार रुपये किमतीच्या पाचशेच्या नोटा आढळून आल्या होत्या.

Web Title: cash worth over 1 crore seized in pune