‘मॉडर्न’मध्ये कॅशलेसची झलक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

पुणे - बदलत्या परिस्थितीनुसार कॅशलेस व्यवहारांचे महत्त्व लक्षात घेऊन गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘विविधा’ वार्षिक उत्सवात यंदा ‘कॅशलेस इकॉनॉमी’ची झलकही सादर केली. 

पुणे - बदलत्या परिस्थितीनुसार कॅशलेस व्यवहारांचे महत्त्व लक्षात घेऊन गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘विविधा’ वार्षिक उत्सवात यंदा ‘कॅशलेस इकॉनॉमी’ची झलकही सादर केली. 

चार दिवसांच्या या उत्सवात विद्यार्थी स्वतः बनविलेल्या वस्तूंचे, खाद्यपदार्थाचे, खेळांचे विविध स्टॉल्स लावतात. विद्यार्थ्यांना वस्तू बनविण्यासाठी प्रशिक्षण देणे, मॉडर्न शेफ, रन फॉर हेल्थ, आरोग्यासाठी मॅरेथॉन, इतिहास व संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून किल्ले व ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे माहितीपट, आदिवासी वस्तूंचे प्रदर्शन-विक्री असे अनेक उपक्रम राबविले. वेगवेगळ्या क्षेत्रांत नावाजलेल्या व्यक्तींशी बोलता यावे म्हणून ‘ओपन फोरम’ हे व्यासपीठही होते. ‘कॅशलेस इकॉनॉमी’ या उपक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळाला. ‘विविधा’ला सुमारे १५ हजार लोकांनी भेट दिल्याने मोठी आर्थिक उलाढालही झाली.

यंदाच्या उपक्रमाची सुरवात नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, डॉ. प्रभाकर देसाई यांच्या हस्ते झाली. ‘मानव्य’ या एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करण्याऱ्या संस्थेला मदत करण्यासाठी ‘मायक्रोबायोलॉजी’च्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून स्टॉल लावला होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. ज्योती गगनग्रास यांनी केले. 

हा उपक्रम प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमासाठी प्रा. सुरेश तोडकर, प्रा. प्रकाश दीक्षित, उपप्राचार्य, कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले.

Web Title: cashless economy