जातींतील संघर्ष थांबला पाहिजे: डॉ. सबनीस

मंचर (ता. आंबेगाव) : भारतीय संविधान गौरव अभियानानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस.
मंचर (ता. आंबेगाव) : भारतीय संविधान गौरव अभियानानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस.

मंचर (पुणे) : समाजवाद व धर्मनिरपेक्षता यांची बांधिलकी संविधानाने स्वीकारली आहे. पण सध्या हिंदू, मुस्लिम, मराठा, दलित, ब्राह्मण, ब्राह्मणेतर वाद विकोपाला गेले आहेत. वेगवेगळ्या जातींतील व धर्मांतील संघर्षाची आग पेटलेली आहे. हे सर्व थांबले पाहिजे. सार्वभौमत्व व राष्ट्रीयत्व टिकून राहिले पाहिजे. अन्यथा देशातील संघर्ष वाढेल. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था व प्रगतीवर होईल. त्याग व संघर्षातून मिळालेले स्वातंत्र्य धोक्‍यात येऊ शकते, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सोमवारी (ता. 26) भारतीय संविधान गौरव अभियानानिमित्त झालेल्या कार्यक्रमात डॉ. सबनीस बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड होते. या वेळी ललिता सबनीस, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, राजाराम बाणखेले, बाळासाहेब पोखरकर, शकील जाफरी, दत्ता पायमोडे, अरुण लोंढे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रतिज्ञा केली.

कामगार नेते ऍड. बाळासाहेब बाणखेले, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. वैशाली सुपेकर यांनी स्वागत केले. प्रा. तानसेन रणदिवे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com