राज्यव्यापी कामागार संपापासून कास्ट्राईब संघटना अलिप्त

रमेश मोरे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

संप आयोजित करताना मागासवर्गीय संघटनेच्या कोणत्याही नेत्याला बोलावले नसल्याने या राज्यव्यापी कामगार संपात कृष्णा इंगळे प्रणित कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांत्या वतीने काम सुरू ठेवुन संपात सहभागी होणार नसल्याचे मुख्यंमत्री तथा राज्यशासनाला कळविले आहे.

जुनी सांगवी - राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज़्व्यापी संपापासुन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने अलिप्त राहुन काम सुरू ठेवुन या संपाला विरोध केला आहे.राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पन्नास मागण्यांमधे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या एकाही मागणीचा समावेश केला नसल्याने तसेच हा राज्यव्यापी संप आयोजित करताना विचारात न घेतल्याने महाराष्ट्र कास्ट्राईब महासंघ कामगारांनी या संपाकडे पाठ फिरवली आहे.

संप आयोजित करताना मागासवर्गीय संघटनेच्या कोणत्याही नेत्याला बोलावले नसल्याने या राज्यव्यापी कामगार संपात कृष्णा इंगळे प्रणित कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांत्या वतीने काम सुरू ठेवुन संपात सहभागी होणार नसल्याचे मुख्यंमत्री तथा राज्यशासनाला कळविले आहे.

संघटनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील कास्ट्राईब कामगार संघाच्या कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयात कामावर हजर राहण्याचे कळविले आहे. याबाबत पुणे जिल्हाध्यक्ष रविंद्र पारधे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कास्ट्राईब महासंघ या राज्यव्यापी कामगार संपात सहभागी होत नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Castro organization detached from Statewide workers agitation