मांजरी - प्रदर्शनाच्या नावाखाली उद्योजकांना लाखोंचा गंडा

कृष्णकांत कोबल
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मांजरी - दुबई येथे उद्योग प्रदर्शनाचे अमीष दाखवून पिंपळे सौदागर येथील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या नावाखाली एका दांपत्याने शहर व जिल्ह्यातील सुमारे पंचवीसच्यावर उत्पादक उद्योजकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. यामध्ये फसवणूक झालेल्या उद्योजकांनी सांगवी पोलिस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी तक्रार दिली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप संबधितांवर गुन्हा दाखल केला नसल्याने फसवणूक झालेल्या उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विविध पदार्थ उत्पादक, प्रक्रिया उद्योजक व इतर उत्पादकांचा व्हाट्सएप ग्रुप आहे. या ग्रुपवर संबधीत इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीकडून दुबई येथे नोव्हेंबर २०१७ मध्ये प्रदर्शन लावण्यात येणार असल्याची माहिती उद्योजकांना मिळाली होती. त्यानुसार राज्यातील विविध भागातील उद्योजकांनी सहभागी होण्याचे ठरविले होते. पुणे परिसरातील काही उद्योजकांनी संबधीत इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीने सांगितल्यानुसार कंपनी संचालकांच्या खात्यावर सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपये जमा केले होते. मात्र, सहा महिने होऊनही वारंवार प्रदर्शनाच्या तारखा बदलूनही आजपर्यंत उद्योजकांना त्यामध्ये सहभागी होता आले नाही. 

दरम्यान या उद्योजकांनी संबंधीत संचालकांकडे भरलेल्या रकमेची वारंवार मागणी करुनही ते अद्याप मिळालेले नाहीत. पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने श्री देवश्री फूडचे प्रसाद आपटे, नॅचरल अॅग्रोच्या नेहा घावटे, ऋषिकेश डेकोरचे ऋषिकेश खैरनार आदी उद्योजकांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाकडेही त्याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करून दोन महिने उलटून गेलेले आहेत. मात्र, संबधितावर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे या उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली असून न्याय मिळण्याची मागणी केली आहे.पोलिस अधिकारी संभाजी पाटील म्हणाले, "संबंधीत इव्हेन्ट मँनेजमेंट कंपनीच्या संचालकांकडे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.''

Web Title: Cats - Taking millions of entrepreneurs into the name of the exhibition