आता गुन्हेगारांना पकडण्यासाठी 'स्पॉटर किट' ठरणार उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

गुन्हेगारांसह संशयितांचा पाठलाग करण्यासाठी तसेच त्यांचा माग शोधून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी 'स्पॉटर कीट' विकसित केले आहे. त्यामाध्यमातून विविध तंत्रज्ञानाद्वारे व मोबाईल सूचनेनुसार ३६० अंशात फोटो घेणारे कॅमेरे यांमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार आहे. 

पुणे : गुन्हेगारांसह संशयितांचा पाठलाग करण्यासाठी तसेच त्यांचा माग शोधून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी 'स्पॉटर कीट' विकसित केले आहे. त्यामाध्यमातून विविध तंत्रज्ञानाद्वारे व मोबाईल सूचनेनुसार ३६० अंशात फोटो घेणारे कॅमेरे यांमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार आहे.

या कीटद्वारे महत्वाच्या आणि अतिमहत्वाच्या व्यकींसह नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त मीतेश घट्टे यांच्या हस्ते कीटचे अनावर आयुक्तालयात करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To caught culprit the 'spotter kit will be useful