कोरोनामुळे बदलले चित्र; खबरदारी अन् जबाबदारी घेत पुण्यात सलून उघडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

'कोरोना'पूर्वी सलून मधील प्रत्येक खुर्चीवर ग्राहकांची दाढी, कटींग यासह इतर सेवा सुरू असायची.काही जण बाकड्यावर वेटींगमध्ये असायचे. खुर्चीवरील ग्राहकाला टाॅवले  गुंडाळून, चेहऱ्यावर, केसांवर पाणी मारून थेट कारागिरी सुरू होत होती. मात्र 'कोरोना'मुळे सलून मधील ही सगळी पद्धतच बदलून गेले आहे. 

पुणे : लाॅकडाऊनमुळे तीन महिन्याच्या विश्रांतीनंतर अखेर आजपासून पुन्हा कटींगचे दुकाने सुरू झाली. 'कोरोना' संसर्गाला रोखण्याची खबरदारी अन् जबाबदारी घेत नाभिकांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घेतल्याने दुकानांमधील चित्र ही बदलले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'कोरोना'पूर्वी सलून मधील प्रत्येक खुर्चीवर ग्राहकांची दाढी, कटींग यासह इतर सेवा सुरू असायची.काही जण बाकड्यावर वेटींगमध्ये असायचे. खुर्चीवरील ग्राहकाला टाॅवले  गुंडाळून, चेहऱ्यावर, केसांवर पाणी मारून थेट कारागिरी सुरू होत होती. मात्र 'कोरोना'मुळे सलून मधील ही सगळी पद्धतच बदलून गेले आहे. 

लग्नाच्या पूजेनंतर डीजे लावून सुरू होता डान्स, पोलिसांनी काढली अशी वरात

Image may contain: one or more people, people sitting and indoor

तीन महिने लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद असलेली दुकाने आजपासून (ता. २८) उघडणार असल्याने सलून व्यावसायिकांनी गेल्या दोन दिवसांपासून साफसफाई सुरू केले होती. तसेच यूज अँड थ्रोचे टाॅवले, अॅप्रोन, मास्क, फेस पॅक, ग्लोज, सॅनिटाइजर,  स्प्रे याची ही व्यवस्था लावून ठेवली. दुकानात एका वेळी एकच ग्राहक कसा येईल यासाठी खुर्ची व्यवस्थेत बदल केला. 

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार...

आज सकाळपासून अपाॅईनमेंट घेऊन सलून सेवा सुरू करण्यात आली. सुरूवातीला ग्राहकांला सॅनिटाइजर देणे, त्यानंतर कटींग करण्यापूर्वी डोके धुवने, यूज अँड थ्रोच्या टाॅवेलने डोके पुसून मग अॅप्रोन पांघरूण कटींग सुरू झाली. यावेळी नाभिकांनी स्वतः मास्क, फेसपॅक, ग्लोज घातले होते. कटींग झाल्यानंतर कात्री, वस्तरा, कंगवा सॅनिटाइज करून घेतला जात होता. 

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

कोरोना' लॉकडाऊन मधून अनलॉकच्या दिशेने जाताना राज्य सरकारन अनेक उद्योग, व्यवसाय करण्यास परवानगी दिली. मात्र, थेट शिरीराला व चेहऱ्याला स्पर्श होत असल्याने सूलन, ब्युटीपार्लरला परवानगी दिली नव्हती. गेले तीन महिने व्यवसाय बंद असल्याने नाभिकांवर मोठे संकट आले होते, त्यामुळे दुकान उघडण्यास परवानगी देण्याची मागणी गेले काही दिवस लावून धरली होती. अखेर रविवारपासून दुकान उघडण्यास परवानगी दिल्याने नाभिक व्यवसायिकांनी तयारी केली आहे.

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

"आमचे हातावरचे पोट असल्याने गेले तीन महिने धंदा बंद असल्याने हाल झाले.  आज पासून पुन्हा दुकाने उघडली आहेत, त्यामुळे दिलासा मिळाला. तसेच सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेत आहोत. 
- सलून व्यावसायिक

निर्यात वाढीमुळे बासमती तांदळाला तेजी; प्रती क्विंटल मागे 'एवढी' वाढ

एका ग्राहकास ४५ मिनिटे 
यापूर्वी नुसती कटींग करायची म्हणले तरी १५ मिनिटात होत होती, लगेच दुसरा ग्राहक खुर्चीवर बसत. पण आता एका पाऊन तासानंतर दुसऱ्या ग्राहकाचा नंबर लागत आहे. कटींग करण्यापूर्वी आणि कटींग झाल्यानंतर दुकान स्वच्छ करणे, साहित्य सॅनिटाइज करणे यासाठी वेळ लागत आहे. 
 

भात लावणी करताना प्रवीण तरडे म्हणाले, शेती ईकायची नसती, अशी राखायची असते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: with Caution and responsibility Salon opened in Pune