सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांच्या तपासाला गती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांच्या तपासाला चांगली मदत होत असून, अनेक गुन्ह्यांचा छडा लागत आहे. परंतु, हे कॅमेरे कमी पडत असून, शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी केले. 

पुणे - सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांच्या तपासाला चांगली मदत होत असून, अनेक गुन्ह्यांचा छडा लागत आहे. परंतु, हे कॅमेरे कमी पडत असून, शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी केले. 

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने धायरी येथील मुक्ताई गार्डनमध्ये व्यापारी मेळाव्याचे आयोजन केले होते. पुणे पोलिसांनी शहरांतील व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत म्हणून मोहीम हाती घेतली. याबाबत मोराळे यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक दादासाहेब गायकवाड, पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे उपस्थित होते. 

निवंगुणे म्हणाले, ""प्रत्येक व्यापारी त्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावेल म्हणून आम्ही संघटनेच्या पातळीवर प्रयत्नशील आहोत. व्यापाऱ्यांच्या दुकानांवर दरोडे पडतात, चोऱ्या होतात, त्यांना दमदाटी केली जाते अशा वेळी कॅमेरा असेल, तर या प्रकारांना आळा बसेल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV cameras speed up crime detection