पुणे धर्मप्रांताचा वर्धापनदिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

खडकी येथील सेंट मेरी चर्चमध्ये शनिवारी पुणे धर्मप्रांताचा 19 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी बिशप यांच्यासह चाळीस धर्मगुरू उपस्थित होते.

पुणे : खडकी येथील सेंट मेरी चर्चमध्ये शनिवारी पुणे धर्मप्रांताचा 19 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी बिशप यांच्यासह चाळीस धर्मगुरू उपस्थित होते. बिशप शरद गायकवाड यांनी रेव्हरंड डिकन म्हणून पराग लोंढे, विजय म्हंकाळे, जोव क्षीरसागर, सचिन पाथे यांची नेमणूक केली. 

त्यापूर्वी बिशप यांच्या कार्यालयात चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे मॉडरेटर (धर्मगुरू) डॉ. पी. सी. सिंग यांचे गायकवाड यांनी पुणेरी पगडी घालून स्वागत केले. या प्रसंगी जोशूआ रत्नम्‌, विजय जानवडकर, बिशप ऍन्ड्य्रू राठोड, बिशप एम. यू. कसाब, पॉल दुपारे, बिशप विजय साठे, मार्स गोर्डे उपस्थित होते, अशी माहिती पुणे धर्मप्रांताचे कायदेशीर सल्लागार सुधीर चांदेकर यांनी दिली. 
 

Web Title: Celebrate anniversary of pune diocese