Video : 'सारी स्पीक'वर मराठीचा जागर; फेसबुक समूहाचा वर्धापन दिन साजरा  

Celebrate the anniversary of the Saree Speak Facebook group in Pune
Celebrate the anniversary of the Saree Speak Facebook group in Pune

पुणे : 'सारी स्पीक' या फेसबुक समूहाचा वर्धापन दिन सदस्य महिलांनी "मी मराठी' या संकल्पनेतून साजरा केला. गोंधळ, लावणी, भारूड, लेझीम नृत्याचे सादरीकरण केले. 
गोव्यातील विली टंडन-केणी यांनी फेसबुकवर हा समूह सुरू केला आहे. त्यात जगभरातील एक लाखाहून अधिक महिला सहभागी आहेत.

पुणेकरांनो, सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? मग, 'ही' बातमी वाचा


राष्ट्रीयस्तरावरील कार्यक्रम गोव्यात होतो. ज्या सदस्यांना तिथे जाणे शक्‍य होत नाही, ते त्यांच्या शहरात वर्धापन दिन साजरा करतात. पुण्यातील महिलांनी डेक्कन जिमखाना येथे वर्धापन दिन साजरा केला.

विश्वासदर्शक ठरावात पुरंदरचे जगताप ठरले लकी आमदार     

सदस्या संगीता चुग, लीना रानडे-गवंडे आणि आदिती आपटे म्हणाल्या, ''या वर्षी लावणी, लेझीम नृत्य, गायन तसेच भौगोलिक, सांस्कृतिक प्रश्‍नमंजूषा, कविता वाचन केले. शंभर महिला सहभागी झाल्या होत्या.'' 

राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत एनडीएचा 137वा दिक्षान्त समारंभ साजरा

पुण्यासह दिल्ली, चेन्नई, बंगळूर यांसह अनेक शहरांत तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये हा दिन साजरा झाला. सर्वच ठिकाणी मी मराठी हीच संकल्पना होती. त्यात परदेशी महिलांनी महाराष्ट्राचा पारंपरिक वेष परिधान केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com