छत्रपती शाहु महाराज यांची १४४ वी जयंती साजरी

रमेश मोरे
गुरुवार, 28 जून 2018

जुनी सांगवी येथील राहुल तरूण मंडळ व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने छत्रपती शाहु महाराज यांची १४४ वी जयंती साजरी करण्यात आली. शाहीर सुरेशराव सुर्यवंशी सांगलीकर यांनी छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या, जिवनाचे दर्शन घडविणारे पोवाडे सादर करून प्रबोधन केले.

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील राहुल तरूण मंडळ व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने छत्रपती शाहु महाराज यांची १४४ वी जयंती साजरी करण्यात आली. शाहीर सुरेशराव सुर्यवंशी सांगलीकर यांनी छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या, जिवनाचे दर्शन घडविणारे पोवाडे सादर करून प्रबोधन केले.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा ईतिहास भावी पिढीसमोर मांडणे हा या मागील हेतु असल्याचे शाहिर सुरेश सुर्यवंशी यांनी पोवाड्यातुन सांगीतले. राहुल तरूण मंडळाचा पन्नासावा वर्धापनदिन,शाहुमहाराज जयंती निमित्त या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सामाजिक कार्यकर्ता, पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला .तर, प्रमुख पाहुणे म्हणुन राजेंद्र घुमे सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे हे उपस्थित होते.

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात बौद्ध धम्म प्रचारक विशाल तुळवे, समाजसेविका अनिता सावळे, प्रकाश जाधव, दत्तोबा कांबळे, फिरोज मुल्ला आदी बावीस जणांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र पारधे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक म्हस्के यांनी तर, राहुल तरूण मंडळाचे अध्यक्ष पंकज कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Web Title: celebrate Chhatrapati Shahu Maharaj 144th birth anniversary