अजितदादा इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये उत्साहात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

संतोष आटोळे 
शुक्रवार, 22 जून 2018

शिर्सुफळ - शारीरिक आणि मानसिक सुदृढता येण्यासाठी योगाची नितांत आवश्यकता आहे. योगामुळे अनेक आजार दूर पळतात. तसेच एकाग्रता वाढून सकारात्मक दृष्टिकोन वाढतो व गुणवत्ताही वाढीस लागते. यामुळे फक्त एकच दिवस योगा न करता रोज योगा करायला हवा असे आवाहन सदगुरु श्री वामनराव पै. शिक्षण संस्थेच्या सचिव संगिता मोकाशी यांनी केले.

बारामती तालुक्यातील कटफळ येथील अजितदादा इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये योग दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी संगीता मोकाशी बोलत होत्या. यावेळी योग शिक्षक मनोज मदने यांनी विद्यार्थ्यांना कपालभारती प्राणायाम, अनुलोम विलोम, नाडीशोधन, भ्रामरी, वृक्षासन, वज्रासन, अर्धचक्रासन इत्यादी योगा करण्याचे प्रकार शिकविले. यामध्ये पहिले ते सहावीच्या सर्व विद्यार्थी, प्राचार्या स्वाती आटोळे,  शिक्षक, शिक्षक तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला

Web Title: Celebrate International Yoga Day in Abhitadada English Medium School