बारामतीत जागतिक शांतता दिवस साजरा

baramati.
baramati.

बारामती शहर - सर्व्हास इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने आज बारामतीत जागतिक शांतता दिवस साजरा केला गेला. सर्व्हास इंटरनॅशनल संस्थेच्या फ्रान्स देशाचे सदस्य अरनाल्डो व लॉरेन्स यांच्या उपस्थितीत आज बारामतीत कार्यक्रम झाला. 

शहरातील अशोकनगरमधील वनस्थळी संस्थेच्या शाळेमध्ये या दोन्ही परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यंदाच्या गणेशोत्सवासाठी फ्रान्समधून वीसहून अधिक सर्व्हासचे सदस्य पुण्यात आले होते, त्या पैकी अरनाल्डो व लॉरेन्स बारामतीत आले आहेत. 

भारतीय संस्कृती, येथील चालीरिती व सणांच्या परंपरा यांची माहिती करुन घेणे हा त्यांच्या भेटीमागील हेतू असल्याची माहिती सर्व्हासचे भारतीय प्रतिनिधी अभय शहा यांनी दिली. बारामतीत आज अँड राजेंद्र काळे, डॉ. राजेश कोकरे, डॉ. संजीव कोल्हटकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. बारामतीत वास्तव्य करुन ते ग्रामीण जीवन कसे असते याची माहिती घेणार आहेत. 

जागतिक शांतता दिवसाच्या निमित्ताने सर्व जगात शांतता नांदावी व युध्दाचे वातावरण बदलून सुखी व समृध्द जग व्हावे असे विचार या प्रसंगी मांडले गेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com