जुन्नरला भगवान महावीर जन्म उत्साहात

दत्ता म्हसकर
गुरुवार, 29 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : संपूर्ण जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसवे तीर्थंकर भगवान महावीरांचे जन्मकल्याणक जुन्नर येथे मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरे करण्यात आले. शहरातून निघालेल्या मिरवणुकित भगवान महावीरांची प्रतिमा असलेली पालखी, फुलांनी सुशोभित रथ,  वाद्यवृंद आणि जैन बांधव,युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

श्वेतांबर मूर्तिपूजक संघ व वर्धमान स्थानकवासी संघ आयोजित या मिरवणुकीत युवकांनी पारंपारिक रास दांडिया नृत्य सादर केले. नगर पालिके जवळ नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक भाऊ कुंभार, समीर भगत यांनी महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जैन स्थानकात महावीरांचे विचारांचे पठण करण्यात आले.जैन भुवन येथे मुथा परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.  युवकांनी अहिंसा रॅलीचे आयोजन केले होते. याप्रसंगी 'जिओ और जिने दो', 'अहिंसा परमो धर्म की जय' आदी घोषणा देण्यात आल्या. मिरवणूक मार्गावर सरबत व सुगंधी दुधाचे नियोजन अनुप शाह, हितेश शाह, बाळासाहेब जोशी आणि जैन स्थानकाच्या वतीने करण्यात आले होते. 

Web Title: celebrated mahavir jayanti in junnar