पुणे - लासुर्णेमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी

राजकुमार थोरात
गुरुवार, 29 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : लासुर्णे (ता इंदापुर) येथे  भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

वालचंदनगर (पुणे) : लासुर्णे (ता इंदापुर) येथे  भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

सकाळी महावीरांच्या मुर्तीची पालखीमधुन  गावतुन सवाद्य  भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये लासुर्णे,जंक्शन,अंथुर्णे परीसरातील जैन बांधव  व भगिनींनी मिरवणुकीमध्ये उत्सफुर्तपणे सहभाग घेतला. जैन मंदिरात पालखी आल्यानंतर  भगवान महावीरांच्या मुर्तीस पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला.महावीरांच्या मुर्तीचे  विधीवत पुजन करुन  दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महावीरांचा जन्मोउत्सव साजरा करण्यात आला.सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्य्रकमांचे आयोजन करण्यात आले.  यावेळी  विनाेद गांधी, सचिन गांधी,प्रशांत गांधी, स्वराज गांधी, रोहित गांधी,धीरज गांधी,परिमल गांधी,मंगेश गांधी,सुनिल गांधी, ललीत गांधी, राजेश गांधी,योगेश गांधी, प्रणव गांधी, शाश्वत दोशी,वूषभ गांधी, शशांक गांधी यांच्यासह परिसरातील जैन समाज मिरवणूकीमध्ये सहभागी झाले होते.

Web Title: celebrated mahavir jayanti in lasurne pune