पुणे - सांगवीत महावीर जयंती उत्साहात

रमेश मोरे
गुरुवार, 29 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीत महावीर जयंतीनिमित्त येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर सांगवी येथे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

धार्मिक विधीनुसार सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. याचबरोबर पांढरी व केशरी वस्त्र परिधान केलेल्या समाज बांधवांनी सजवलेल्या रथामधुन भगवान महावीर मुर्तीची नवी सांगवी येथुन मिरवणुक काढण्यात आली. एम के.हॉटेल चौकातुन निघालेली ही मिरवणुक क्रांती चौक, कृष्णा चौक, मार्गे साई चौक, शितोळेनगर मार्गावरून ढोरे नगर येथील मंदिरात मिरवणुक शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

सकाळी ९ ते १ यावेळेत मोरया रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे, आयोजन करण्यात आले होते. यात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मोरया रक्तपेढीच्या डॉ. कविता मानोधने यांच्या मार्गदर्शनाखाली रेश्मा जाधव, गणेश दुपेली यांनी योगदान दिले. सकाळी बोली, पंचामृत अभिषेक, शांतीधारा, अभिषेक व नामकरण सोहळा, चढावे इत्यादी धार्मिक विधी करण्यात आले.

शोभायात्रा मिरवणुकीचे प्रमख चौकांमधुन स्वागत करण्यात आले. येथील शितोळे चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशांत शितोळे अतुल शितोळे, शिवसेनेच्या वतीने दिपक ढोरे यांनी मिरवणुकीचे स्वागत करून भगवान महावीर मुर्तीस पुष्पहार अर्पण केला. विविध सामाजिक संघटना,राजकीय पदाधिका-यांनी मिरवणुकीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. मिरवणुक सांगता समारंभानंतर कार्यक्रमास उपस्थित नगरसेविका माई ढोरे,प्रतिभा महिला प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा अश्विनीताई जगताप,नगरसेवक हर्षल ढोरे,शारदा सोनवणे,अनुश्री ढोरे,शितल शितोळे यांचा राजस्थानी पगडी व शाल श्रीफळ देवुन मंदीर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. जितेंद्र गुगळे,अशोक पगारीया ,मनोज गांधी,विजयकुमार गांधी यांनी मिरवणुकीचे संचलन केले.

Web Title: celebrated mahavir jayanti in sangavi pune