पुणे जिल्हा रुग्णालयात नाइटिंगेल दिवस साजरा

बाबा तारे
शनिवार, 12 मे 2018

औंध (पुणे) : दुसऱ्या महायुद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर दिवस रात्र झटून प्रथमोपचार करुन आपले योगदान देणाऱ्या अग्रगण्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस हा आज औंध येथील जिल्हा रुग्णालयात 'फ्लॉरेंस नाइटिंगेल दिवस' साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात रुग्णालयाच्या मुख्य अधिसेविका वर्षा कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रुद्राप्पा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या काळात विद्युत यंत्रणा नसल्यामुळे फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी हातात कंदील घेऊन रात्रंदिवस रुग्ण सेवा केली होती, म्हणून त्यांना 'द लेडी विथ द लॅंप' असे संबोधले जायचे.

जागतिक पातळीवर फ्लॉरेन्स नाइटींगेल यांची आठवण म्हणून हा दिन साजरा केला जातो.नाइटिंगेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्ण सेवेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिपरिचरिकांना 'फ्लॉरेंन्स नाइटिंगेल' ह्या पुरस्काराने गौरविण्यात येते.यानिमित्ताने सन 2017-18 या चालू वर्षी पुणे जिल्हा पातळीवर जिल्हा रुग्णालयाच्या अधिपरिचरिका  सुनीता गाढवे यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन  रुग्णालयाच्या मुख अधिसेविका वर्षा कुलकर्णी आणि ललिता क्षिरसागर यांनी केले.

Web Title: celebrates Nightingale day as a nurse day in aundh pune