डोंगरावर वृक्षारोपण करून डॉक्टर दिवस साजरा

दत्ता म्हसकर
सोमवार, 2 जुलै 2018

पिंपळवंडी ता.जुन्नर येथे डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मुंजोबा डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.

जुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मुंजोबा डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. पिंपळवंडी येथील डॉ. अशोक कोठाडीया, डॉ. संदीप रोहकले आणि त्यांचे सहकारी तसेच पिंपळवंडीचे उपसरपंच प्रदीप चाळक, संदीप लेंडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश वामन, धोंडीभाऊ खिल्लारी, निखिल बारभाई, सिद्धार्थ कसबे, मिहीर खिल्लारी यांनी वृक्षारोपण केले. डॉक्टर दिन एक वेगळ्या प्रकारे साजरा केला. या ग्रुपचे सदस्य असलेले  ७६ वर्षांचे डॉ. कोठाडीया हे अनेक वर्षे ट्रेकिंग करत आहेत. आज या वयातही अनेक गड किल्ले सर करणाऱ्या कोठाडीया यांनी सर्वच वयोगटातील व्यक्तींसमोर एक आदर्श ठेवला आहे.ताणतणाव कमी करण्यासाठी, शारिरीक तंदुरुस्ती राखण्यासाठी आपण ट्रेकिंग करणे आवश्यक आहे. तसेच ट्रेकिंग करत असताना निसर्गाची कोणतीही हानी न करता आपण ट्रेक केले पाहिजे असे डॉ. रोहकले यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Celebrating Doctor Day by planting trees on the hill