आय केयर क्लिनिक पाषाण येथे 'डॉक्टर्स डे' साजरा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे -  डॉ. बिधान चंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी म्हणजे एक जुलै हा 'डॉक्टर्स डे' म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबविले जातात. आय केयर क्लिनिक पाषाण येथे नुकताच 'डॉक्टर्स डे' साजरा करण्यात आला.

यावेळी, आय केयर क्लिनिक पाषाणमध्ये डॉक्टरांची बैठक झाली. मधुमेह तज्ज्ञ डॉ सुरुची मांद्रेकर यांनी 'आरोग्यासाठीच्या तपासण्या आणि काळजी' विषयावर व्याख्यान दिले. मेट्रोपोलीस येथे पॅथॉलॉजिस्ट असलेले डॉ निलेश भामरे यांनी 'पॅथॉलॉजी मधील नवीन तपासण्या' बाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला पाषाणमधील वेगवेगळ्या मान्यवर डॉक्टरांची उपस्थिती होती. रुग्णाच्या मदतीसाठी सर्व डॉक्टरांनी एकत्र काम केले पाहिजे असे मत मांडून आय केयर क्लिनिक पाषाणच्या संचालिका डॉ अरुंधती पांडे सर्वांचे आभार मानले. 

बिधन चंद्र रॉय हे हे एक निष्णात डॉक्टर होते. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री देखील होते. तसेच आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी होते. 

Web Title: Celebrating 'Doctor's Day' at the eye Care Clinic pashan