पुणे - उरूळी कांचनमध्ये आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहूून अभिवादन

जनार्दन दांडगे
शनिवार, 14 एप्रिल 2018

उरुळी कांचन (पुणे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत सभागृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, सरपंच अश्विनी कांचन, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या निधीतून येथील जिजामाता सभागृहात सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. तसेच शिंदवणे रस्ता येथील श्री गजानन मतिमंद विद्यालयास एक संगणक, प्रोजेक्टर व सतरंज्या अशा २ लाख रुपयांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच भारतीज जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे यांनी येथील बडेकरनगर प्रवेशद्वाराच्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण काळभोर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अजिंक्य कांचन उपस्थित होते. 

नायगाव (ता. हवेली) येथील सिद्धार्थनगर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच प्रज्ञा साखरे, माजी सरपंच सागर चौधरी, विकास चौधरी, माजी उपसरपंच गणेश चौधरी उपस्थित होते. यावेळी गावातील जेष्ठ नागरिकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रयागधाम (ता. हवेली) येथील भिमनगर येथे भिमनगर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संविधान फौंडेशनचे अध्यक्ष विशाल शेलार यांनी दिली. १४ ते १८ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेचे पूजन व सामुहिक वंदनाने झाली. यामध्ये शनिवारी (ता. १४) मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. रविवारी (ता. १५) सायंकाळी भव्य मिरवणूक, सोमवारी (ता. १६) महिलांसाठी आनंद मेळावा, मंगळवारी (ता. १७) सामुहिक वंदना व सुत्त पठन व बुधवारी (ता. १८) श्रीमंत कोकाटे यांच्या शिवव्याख्यानाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

थेऊर (ता. हवेली) येथे सरपंच नंदा कुंजीर यांनी डॉ.  बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपसरपंच आप्पासाहेब काळे, राहुल कांबळे, सुरेश कांबळे, अंकुश कांबळे, पोपट घुगे, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर बडे उपस्थित होते.

Web Title: celebration on ambedakr jayanti in uruli kanchan pune