अंथुर्णेमध्ये लाडू वाटप करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

राजकुमार थोरात
शनिवार, 14 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : अंथुर्णे  (ता.इंदापूर) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून लाडू वाटप करण्यात आले.

वालचंदनगर (पुणे) : अंथुर्णे  (ता.इंदापूर) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून लाडू वाटप करण्यात आले.

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने  जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निलध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिसूर्य महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,आणणा भाऊ साठे,अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, डॉ.बाबासाहेबांचे कार्य महान असून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन युवकांनी वाटचाल करणे गरजेचे आहे. तालुक्यातील विकासापासून वंचित असलेल्या समाज घटकांना प्रवाहात आणण्यासाठी कार्य करत असून विकासनिधी कमी पडून देणार नसल्याचे सांगितले. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने म्हणाले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे सर्वांना समान अधिकार मिळाले आहेत.सर्वसामान्य व्यक्तिही देशाच्या उच्चपदावर विराजमान होवू शकत असल्याचे सांगितले. युवकांनी बाबासाहेबांच्या विचाराची पुस्तके वाचणे गरजेचे असून त्यासाठी वाचनालय उभारण्यास आपण मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

यावेळी  लाडू वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला.कार्यक्रमास तात्याराम शिंदे, भाजपचे युवराज म्हस्के, बाळासाहेब शिंदे,विजय शिंदे, भरणेवाडीचे उपसरपंच गुलाब म्हस्के, माजी सरपंच तानाजी शिंदे,दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन एल.के.साबळे, अॅड.शशिकांत साबळे, माजी सरपंच राहुल साबळे,विशाल साबळे,अंबादास साबळे,कालिदास साबळे,प्रदीप साबळे,पिंटू साबळे,पपेश साबळे,जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष बापू अडागळे,उपाध्यक्ष जनार्धन खरात,संजय साबळे,अनुप साबळे,गोरख साबळे यांनी केले.

Web Title: celebration of ambedkar jayanti in anthurne pune