लासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

राजकुमार थोरात
गुरुवार, 26 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केले.

लासुर्णे (ता. इंदापुर) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. येथे प्रत्येकवर्षी एप्रिल महिन्यातील शेवटच्या बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. येथे बुधवारी (ता.२५) जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

सकाळी निल ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये माने बोलत होते. यावेळी  छत्रपती कारखान्याचे संचालक अमोल पाटील, अॅड. तेजसिंह पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष संतोष लोंढे, हर्षवर्धन लोंढे, गजानन वाकसे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ लोंढे, दिपक चव्हाण,विजय निंबाळकर, संतोष वामन लोंढे  उपस्थित होते.यावेळी माने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी आहेत. आज त्यांच्यामुळे सर्वसामान्य व्यक्तिला हक्क,अधिकारी मिळाले असल्याचे सांगितले. यावेळी माने यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.  रात्री दहा वाजता सारेगमप महाराष्ट्राचा महागायक अभिजीत कोसंबी यांच्या गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
Web Title: celebration of ambedkar jayanti in anthurne valchandnagar pune