जुन्नरला महामानवास अभिवादन      

दत्ता म्हसकर
शनिवार, 14 एप्रिल 2018

जुन्नर (पुणे) : जुन्नरला विविध संस्था तसेच संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महामानवास अभिवादन करण्यात आले. जुन्नर शहर भारतीय जनता पार्टी, मातंग एकता आंदोलन, स्वराज्य मित्र मंडळ, सजग नागरी मंच तसेच राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी आंबेडकर यांच्या नेहरू बाजार येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सव निमित्त आज उत्सव मंडळाच्या वतीने जुन्नर शहरातून सकाळी भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. नेहरू बाजार येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने जिलेबी वाटप करण्यात आले. दुपारी  भिमनगर-पाडळी येथे स्नेहभोजन आयोजित केले होते.सायंकाळी  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जुन्नर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. 

Web Title: celebration of ambedkar jayanti in junnar