डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, विचारांचा आदर्श घ्या - भरणे

राजकुमार थोरात
शनिवार, 14 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, विचारांचा आदर्श घेवून समाजाच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.

वालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, विचारांचा आदर्श घेवून समाजाच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी वालचंदनगर कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी आनंद नगरकर, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, झेडपीचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, सदस्य अभिजित तांबिले, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, सरपंच छाया माेरे, पंचायत समिती सदस्या सारिका लोंढे, ग्रामपंचायत सदस्या वैशाली पोपट मिसाळ उपस्थित होते.

यावेळी भरणे यांनी सांगितले की, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज सर्वासाठी एकच कायदा तयार झाला आहे.त्यांनी प्रतिकुल परस्थितीमध्ये ३२ पदव्या प्राप्त केल्या होत्या.त्यांच्या विचारांचा,कार्याचा अादर्श युवकांनी घेवून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यावेळी झेडपी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना वाचनाची आवड होती.पुस्तकांसाठी घर बांधणारे जगातील एकमेव व्यक्तिमत्व होते. त्यांचा युवकांनी आदर्श घेवून जास्तीजास्त पुस्तकांचे वाचन करुन वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम लोंढे, सुत्रसंचालन पार्वती बनसोडे,नलिनी गायकवाड व आभार सचिन कांबळे यांनी मानले.कार्य्रकम यशस्वी करण्यासाठी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे रोहित झेंडे, राहुल जाधव, पप्पू कांबळे,सागर ननवरे, अनिल कांबळे,सुनिल कांबळे, मिलिंद चितारे यांनी परिश्रम केले.

Web Title: celebration of babasaheb ambedkar jayanti in walchandnagar