कॅप्टन शिवरामपंत दामले यांचा स्मृतीदिन साजरा

LATE-CAPT-SHIVRAMPANT-DAMLE
LATE-CAPT-SHIVRAMPANT-DAMLE

पुणे - महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कॅप्टन शिवरामपंत दामले यांचा 43 वा स्मृतिदिन शनिवारी (ता. २६ ) ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. टिळकरोड येथे महाराष्ट्रीय मंडळात झालेल्या या कार्यक्रमामध्ये शिवरामपंत दामले यांच्या कार्याची ओळख करून देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. 

महाराष्ट्रीय मंडळ शिक्षण विभागाच्या संचालिका नेहा दामले म्हणाल्या, कॅप्टन शिवरामपंत दामले यांच्या कार्याचा गौरव  करण्यासाठी कार्याची ओळख करून देणारा पाठ शालेय पुस्तकांमधून शिकवला पाहिजे. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक भास्कर गोडबोले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या कार्यक्रमात  " मूलभूत कारक कौशल्य' या प्राथमिक शिक्षकांसाठी लिहिलेल्या हस्तपुस्तिकेचे व महाविद्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या " गतिमान शारीरिक शिक्षण' या नियतकालिकाचे प्रकाशन नेहा दामले यांच्या हस्ते करण्यात आले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. शिरीष मोरे यांनी सूत्रसंचालन केले. 

महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृती क्रीडा पुरस्कार मुंबईचे ज्येष्ठ्य कबड्डी मार्गदर्शक व अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार यांना तर कै. लेफ्टनंट जनरल य. द. सहस्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा "उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार' अमोल मचाले यांना दिला जाणार आहे. हा कार्यक्रम नऊ ऑगस्ट रोजी टिळक रस्त्यावरील महाराष्ट्रीय मंडळात एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती यावेळी महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com