बारामतीत श्रीराम मंदीरात दिवे लावून करतायेत आनंद व्यक्त

मिलिंद संगई
Wednesday, 5 August 2020

आज देवळे कुटुंबियांच्या वतीने दिवे लावून फुलांनी सजवत मंदीरात आरास करुन अयोध्येतील श्रीराम मंदीराच्या उभारणीचा आनंद व्यक्त केला गेला. पहाटे दिवे लावून, रांगोळी काढली गेली. बाळासाहेब देवळे यांचे श्रीराम मंदीर असा याचा आजही उल्लेख केला जातो.

बारामती : अयोध्येतील श्रीराम मंदीराच्या पायाभरणीच्या निमित्ताने आज बारामतीतील श्री राम मंदीरात दिवे लावून आनंद साजरा केला गेला. बारामतीच्या या श्रीराम मंदीरालाही ऐतिहासिक परंपरा असून सोळाव्या शतकातील हे मंदीर आहे. आज देवळे कुटुंबियांच्या वतीने दिवे लावून फुलांनी सजवत मंदीरात आरास करुन अयोध्येतील श्रीराम मंदीराच्या उभारणीचा आनंद व्यक्त केला गेला. पहाटे दिवे लावून, रांगोळी काढली गेली. बाळासाहेब देवळे यांचे श्रीराम मंदीर असा याचा आजही उल्लेख केला जातो. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Image may contain: indoor and outdoor
या मंदीरामध्ये संस्थापक असलेल्या रामजीदादा देवळे बारामतीकर यांनी 1734 मध्ये समाधी घेतली होती. ते समाधीस्थळ आजही येथे अस्तित्वात आहे. रामजीदादा व रावजीदादा असे दोन बंधू होते. त्यातील रावजीदादा यांची पुढील पिढी म्हणजे लक्ष्मण भिकाजी देवळे, त्यांच्या नंतर बाळासाहेब लक्ष्मण देवळे, त्या पुढील पिढी म्हणजे किशोर व मकरंद बाळासाहेब देवळे यांची पिढी आहे. सध्या ओंकार देवळे यांच्या रुपाने पाचवी पिढी या श्रीराम मंदीराचे व्यवस्थापन पाहत आहे. 
Image may contain: indoor

पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

रामदास स्वामींचे दोन शिष्य होते. कल्याण स्वामी व उध्दव स्वामी. बारामतीचे श्रीराम मंदीर म्हणजेच यातील कल्याण स्वामी यांचा मठही आहे. देवळे पिढी ही कल्याण स्वामींचेच वंशज आहेत.कविवर्य मोरोपंतांनीही आपल्या लेखनातून या श्रीराम मंदीराचा उल्लेख केला आहे. बारामती पंचक्रोशीतील सर्वात जुने श्रीराममंदीर आहे.  तालुक्यातील मळद येथे जे मारुती मंदीर आहे, तिथे रामजन्माच्या दिवशी या मंदीरातून पालखी जाते. हनुमानाला बोलाविण्यासाठी खुद्द श्रीराम जातात, अशी या मागची आख्यायिका आहे. सज्जनगडावर ज्या प्रमाणे उपासना चालते, त्याच धर्तीवर बारामतीच्याही श्रीराम मंदीरात उपासना केली जाते. 

Image may contain: indoor

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

शरद पवार यांचेही वेगळे ऋणानुबंध.....
या श्रीराम मंदीरामध्ये शरद पवार यांच्या पहिल्या विधानसभा निवडणूकीची सगळी व्यूहरचना झाली होती. 1967 मध्ये शरद पवार यांनी पहिली निवडणूक लढवली, त्याच्या सर्व बैठका व त्यानंतर अनेक वर्षे पवार यांचे राजकारण स्व. बाळासाहेब देवळे यांच्या समवेत याच श्रीराम मंदीरातून झाले. इतकेच नाही तर शरद पवार यांचे लग्न ज्या दिवशी बारामतीत झाले, त्याच्या हळदीचे व इतर सर्व विधीही याच श्रीराम मंदीरात झालेले आहेत. 

Image may contain: 3 people, indoor

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebration by lighting lamps in Shri Ram temple in Baramati