esakal | महात्मा गांधी व लालबहादूर शास्री जयंती विविध उपक्रमांनी साजरी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

महात्मा गांधी व लालबहादूर शास्री जयंती विविध उपक्रमांनी साजरी

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

हडपसर : प्रबोधन फेरी, स्वच्छता मोहीम व आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आदी विविध उपक्रम राबवून हडपसर परिसरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माळवाडी येथील आइडिया फाऊंडेशनतर्फे स्वच्छता व रोगराई पसरू नये म्हणून जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या हस्ते नागरिकांना मोफत मास्क चे वाटप करण्यात आले. संस्थेच्या संस्थापकउषा पिल्ले, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता जमदाडे, कार्यकर्ते कुणाल सावंत, अमन सय्यद, शुभम बिनवडे, राधिका कोळी, आकांक्षा शेंडगे, साक्षी थोरात, पूजा जगताप यांनी संयोजन केले.

सय्यदनगर परिसरात हडपसर विधानसभा काँग्रेस व आयडियल एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत नेत्रतपासणी, चश्मेवाटप, औषधे वाटप, कान-नाक-घसा तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र्र प्रदेश अध्यक्ष आमीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, विचारवंत प्रा. सुभाष वारे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.

प्रा. शोएब इनामदार, आयडीयलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. शफी इनामदार, सचिव डॉ. मुसद्दीक इनामदार, नेत्रतज्ञ डॉ. अबोली इनामदार ओबीसी शहराध्यक्ष साहिल केदारी, विठ्ठल गायकवाड, शकीला इनामदार, रमेश राऊत, अजित ससाणे, बाळासाहेब ससाणे, पुष्पाताई गायकवाड, जबीन सय्यद, रिफान इनामदार, नूर शेख, इम्रान शेख, अकबर शेख आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा: बारामतीत सहायक पोलिस उपनिरिक्षकास लाच घेताना अटक

हडपसर गावठाण, कात्रज, हांडेवाडी, महंमदवाडी, काळेपडळ, सय्यदनगर, ससाणेनगर, केशवनगर, रामटेकडी परिसरातील सुमारे तेराशेहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शिबिराचा लाभ घेतला. सुमतीभाई शहा वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्रतज्ञ तसेच सय्यदनगर मधील ४५ स्वयंसेविकांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. स्वयंसेविका तसेच डॉक्टरांचा प्रशिस्तीपत्रक व मानधन देऊन शिबिराचा समारोप करण्यात आला. हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रा. शोएब इनामदार आणि संस्थेचे कार्याध्यक्ष फहीम इनामदार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर, प्रा. इम्रान शेख यांनी सूत्रसंचालन केले.

हडपसर मोहल्ला कमिटी तर्फे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागातील कोव्हीड योद्ध्यांचे चरण पूजन करून सत्कार करण्यात आला. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय घनवट, आरोग्य निरीक्षक वसंत ससाणे, राजेंद्र वायदंडे, सादिक शेख, नितीन कांबळे, कीटक प्रतिबंधक निरीक्षक नीलांबर खरात तसेच महिला सफाई कर्मचारी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

हडपसर मोहल्ला कमिटी तर्फे अध्येक्ष रवींद्र चव्हाण, ओम करे, अशोक सोरगावी, दीपाली कवडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजादि का अमृत महोत्सव, महात्मा गांधी जयंती निमित्त प्रभाग क्रमांक २३ मध्ये हडपसर गावठाण वेशी समोर उड्डाण पूलाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे, वैशाली बनकर, उज्वला जंगले आदी उपस्थित होते.

loading image
go to top