श्री मुंजोबा महाराज उत्सवाची कुस्त्यांच्या आखाड्याने सांगता

sangavi
sangavi

नवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज यांची उत्सव यात्रा नुकतीच संपन्न झाली. पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजता श्री मुंजोबा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातील सर्व देवतांना ढोल ताशेच्या निनादात पानफुल वाहण्यात आले. तर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले. रात्री श्री मुंजोबा महाराज पालखी मिरवणूक काढण्यात आली, टाळ मृदुंगाच्या गजरात गाव प्रदक्षिना घालत पालखी मिरवणूक मुख्य मंदिरात परत आली.  मुख्य मंदिरासह गावातील सर्वच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर अनेक प्रकारच्या फुलांनी मुख्य मंदिराचा गाभारा सजविण्यात आला होता.

उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने राज्यस्तरीय कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. यात राज्यातील व परराज्यातील नामवंत अशा १२० मल्लांनी सहभाग घेतला. यावेळी वजनी व खुल्या गटात कुस्त्या झाल्या. सह्याद्री कुस्ती संकुलाचा (उपमहाराष्ट्र केसरी ) राजेंद्र राजमाने व हरियाणाचा जग्गा पैलवान यांच्यात अंतीम लढत झाली. राजेंद्र राजमाने यांनी घिस्सा डावावर हरियाणाचा जग्गा पैलावान यास अवघ्या तीन मिनिटात चितपट करत रोख बक्षीस रुपये एक लाख व चांदीची गदा तसेच " पिंपळे सौदागर किताब २०१८ " हा बहुमान मिळविला  यासह अनेक कुस्तीगीरांनी  चितथरारक कुस्त्या पार पडल्या. पैलवान अर्जुन काटे यांच्या वतीने विजेत्या पैलवानास चांदीची गदा देण्यात आली .  

या उत्सवातील महिला पैलवानांच्या कुस्त्या या विशेष आकर्षन ठरल्या. अक्षदा वाळुंज हिने श्रद्धा भोर हिला कलाजंग डावावर चितपट केले तर रितू संधू व तनुजा आल्हाट यांची कुस्ती प्रेक्षणीय झाली. महिलां पैलवानांना नगरसेविका शीतल काटे, स्वाती शिवाजी काटे व अनिता संदीप काटे यांनी भरघोषबक्षिसे दिली. या आखाड्यासाठी पंच म्हणून बाळासाहेब काळजे, सचिन खांदव, निवृत्ती काकडे, संतोष माचुत्रे, काळुराम कवितके तर हंगेश्वर धायगुडे यांनी उत्कृष्ठ निवेदक म्हणून कामगिरी पार पाडली. यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, वस्ताद किसन लांडगे, राष्ट्रवादी कांग्रेसचे पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी पीसीएमटी सभापती दिलीप बालवडकर, पोलीस पाटील भगवान काटे पाटील, भरत कुंजीर, जयवंत बोडके, राजू काटे, संदीप काटे, चंद्रकांत कुटे, नामदेव आव्हाळे व परिसरातील विविध शेतंत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे यांचा पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच पिंपळे सौदागर ग्रामस्थ यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेता कौतुक डाफळे, ज्ञानेश्वर गोचडे, आकाश माने, तसेच महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, नाथा पारगावकर, दशरद पवार व युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन श्री मुंजोबा महाराज उत्सव कमिटी व अध्यक्ष सुरेश काटे, समस्त ग्रामस्थ पिंपळे सौदागर व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com