पुण्यात शिवजयंती महोत्सव मिरवणूकीस उत्साहात सुरुवात

pune
pune

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवजयंती मोहोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. 

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा सुरू झाला.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटिल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार भीमराव तापकीर, समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, बिव्हिजी ग्रुपचे हणमंत गायकवाड, रोहित पवार, उद्योजक विठ्ठल मानियसार, अभिनेते प्रवीण तरडे आदी यावेळी उपस्थित होते. पाटील यांच्या हस्ते यावेळी दामरावजी गायकवाड यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले. मिरवणुकीचे हे 7वे वर्ष असून यावर्ष त्यात स्वराज सेनापतीचे 75 रथ त्यात सहभागी झाले आहे. मिरवणूकीची सुरुवात कोल्हापूर येथील भवानी मंडप प्रवेशद्वारची प्रतिकृती असलेल्या रथाने झाली. शिवराय आणि मावळ्यांच्या वेशातील अनेक चिमुकले मिरवणुकीत होते. शहरातील विविध लेझीम आणि डोल ताशा पथकांनी वादन केले. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त मिरवणूक मार्गावर तैनात करण्यात आला होता. 

मिरवणुकीत जिजाऊ शहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडु शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुयार्जी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक यांचे रथ सहभागी झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com