जय श्रीराम, जय श्रीराम ! जयघोषाने पुण्यात जल्लोष

संतोष शाळीग्राम
Wednesday, 5 August 2020


रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदीर उभे राहावे म्हणून देशभरात असंख्य कार्यकर्ते प्रतिक्षेत होते. बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर सुमारे अडीच‌ दशकानंतर राम मंदीर उभारणीस‌ मुहूर्त लाभला. त्यामुळे देशातील हिंदू धर्मियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यातही हेच‌ चित्र आहे. गल्लोगल्ली  श्रीरामांचा जयजयकार, आरती आणि भगवा जल्लोष होता.

पुणे : अयोध्यानगरी अवघी भगवी झाली असताना पुण्यातील वातावरणही भगवे झाले आहे. हिंदू धर्मियांचे दैवत प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिराचे भूमिपूजनानिमित्त शहरांत जल्लोष करण्यात आला. घंटानाद आणि जय श्रीराम, जय श्रीराम या‌ जयघोषाने आसमंत‌ व्यापून टाकला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदीर उभे राहावे म्हणून देशभरात असंख्य कार्यकर्ते प्रतिक्षेत होते. बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर सुमारे अडीच‌ दशकानंतर राम मंदीर उभारणीस‌ मुहूर्त लाभला. त्यामुळे देशातील हिंदू धर्मियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यातही हेच‌ चित्र आहे. गल्लोगल्ली  श्रीरामांचा जयजयकार, आरती आणि भगवा जल्लोष होता.

Image may contain: 2 people, outdoor

 पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

घर, सदनिकांची गॅलरीला श्रीरामाचे चित्र असलेले ध्वज लावण्यात‌ आले. भव्य राम मंदिराच्या‌ उभारणीसाठी‌ आज‌ पायाभरणी होत असल्याने जागोजागी, चौकांमध्ये  साखर वाटप,‌ लाडू वाटपही करण्यात‌ आले. शहरातील‌ राम मंदिरांमध्येही सजावट करण्यात आली होती. राम मंदिर उभारणीचे अनेक वर्षांचे‌ स्वप्न साकार झाल्याचा आनंद  प्रत्येक कार्यकर्त्याच्या‌ चेहऱ्यावरून ओसंडत‌ होता.

Image may contain: 10 people, people standing
शहर भाजपच्या वतीने आज पक्ष कार्यालयातही श्रीरामाचे पूजन करून आरती करण्यात‌ आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळली. शहराध्यक्ष जगदीश‌ मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर यांसह अनेक‌ कार्यकर्ते उपस्थित‌ होते. तुळशीबाग येथील राम मंदिर परिसरात साखर लाडूचे वाटप करण्यात आले. अनेक रामभक्त, भाविक यांच्यासह पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे‌ अध्यक्ष हेमंत रासने यावेळी उपस्थित होते. 

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

Image may contain: 2 people

किशोर चव्हाण यावेळी म्हणाले, "अयोध्येत‌ राम मंदीर उभे राहावे, ही प्रत्येक हिंदूची भावना होती. पाचशे वर्षांचा हा लढा आहे. अनेक हिंदू राजे, कार्यकर्त्यांनी त्यासाठी योगदान दिले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदीर उभारणीस सुरवात होत आहे. हा खरेच प्रत्येक हिंदूसाठी भाग्याचा दिवस आहे."

Image may contain: 5 people, people on stage, people standing, crowd and outdoor

जगदीश मुळीक म्हणाले, "कोट्यवधी हिंदूंच्या अपेक्षांची पूर्ती आज होत आहे. त्यामुळे पुण्यातही उत्साहाचे वाचावरण आहे. आम्ही पक्षाच्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करीत‌ आहोत. सामाजिक भान ठेऊन ठिकठिकाणी साखर वाटप केली जात आहे." 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A celebration was held in the city of Pune on the occasion of Bhumi Pujan of Ram Mandir