सिध्देश्वर निंबोडीत 'पानी फाउंडेशनच' तुफान आलंया..

संतोष आटोळे
मंगळवार, 1 मे 2018

शिर्सुफळ : 'पानी फाउंडेशन'च्या श्रमदानाचं तुफान आज बारामती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सिध्देश्वर निंबोडी येथील माळरानावर सकाळी तब्बल तीन तास श्रमदानाच्या माध्यमातून घुमलं.

या तुफानात गावच्या माळरान माथ्यावर अभिनेते अलोक राजवाडे, अभिनेत्री पर्ण पेठे यांच्यासह तीन हजार श्रमाच्या पुजाऱ्यांनी हातात टीकाऊ, फावडे, घमेली घेऊन 70 मीटर लांबीच्या 40 (सी. सी. टी) सलग समतल चर मोठ्या उत्साहात खोदल्या. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर माती व पावसाचे पाणी अडून भूगर्भात मुरणार आहे. निमित्त होते पानी फाउंडेशन उपक्रमांतर्गत महाश्रमदानाचे.

सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) या गावाने यंदा पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धत भाग घेतला आहे. येथे या उपक्रमांतर्गत विविध मृद व जलसंधारणाची कामे सुरु आहेत. त्यानुसार येथील पानी फाउंडेशन टीमने आज 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाश्रमदानाचे आयोजन केले होते. यामध्ये येथील पिराचे मंदिर नजीकच्या माळरानावर आज सकाळी साडे सहा वाजता महाश्रमदानाला सुरवात झाली.

यावेळी गावच्या सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य व आजी- माजी पदाधिकारी व पानी फाउंडेशन टीमचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या श्रमदानात लाऊड स्पिकरवर लावलेल्या  ' तूफान आलंया' ...या गाण्यावर ठेका धरत सलग समतल चर, माती बंधारे, दगडी बांध ही कामे तांत्रिक पद्धतीने करण्यात आली.

या महाश्रमदानासाठी चार- पाच दिवस आधी पानी फाउंडेशन टीम तसेच ग्रामस्थांनी माळरानावर तांत्रिक पध्दतीने पांढरा चुना टाकून आखून नियोजन केले होते. यावर तीन हजार स्वयंमसेवकांनी 70 मीटर लांबीच्या 40 (सी. सी. टी) सलग समतल चर खोदल्या. या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारी माती व पावसाचे पाणी अडून ते भूगर्भात मुरण्यास मदत होणार आहे, अशी पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, प्राजक्ता शिंदे, गणेश विरकर, प्रमोद पवार यांनी दिली.  

जलसंधारणाच्या कामात गावाचा सहभाग आणि नियोजन महत्वाचे - सुनंदा पवार
जलसंधारणाच्या कामात गावाचा सहभाग आणि नियोजन योग्य रितीने केल्यास याचे सकारात्मक परिणाम भविष्यात दिसतील असे प्रतिपादन महाश्रमदानात सहभागी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले.

यावेळी महाश्रमदानात पानी फाऊंडेशनचे पश्चिम महाराष्ट्राच्या मुख्य प्रशिक्षक ज्योती सुर्वे, भगवान चेकबद, बी.एल.मोहिते, बाणेर येथील डाॅ.गारुडकर ग्रुप, पुणे येथील एचडीएफसी बॅकेचे कर्मचारी, तसेच भिगवण येथील रोटरी क्लब, सायकल ग्रुप, नेचर फाऊंडेशन, डाॅक्टर ग्रुप, गावातील जिल्हा परिषद शाळा, श्री छत्रपती हायस्कुल, येथील विद्यार्थी, यांच्यासह हजारोंनी मोठ्या उत्साहात महाश्रमदानात सहभाग घेतला.

Web Title: Celebrities and common man join hands together for Paani foundation