पुण्यात सिमेंटच्या रस्त्यांनाही तडे

पुणे शहरातील प्रमुख रस्ते सिमेंटचे करून जवळपास १५ वर्ष उलटून गेली आहेत, पण या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका ढुंकूनही पाहत नाही.
Pune Road
Pune RoadSakal
Summary

पुणे शहरातील प्रमुख रस्ते सिमेंटचे करून जवळपास १५ वर्ष उलटून गेली आहेत, पण या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका ढुंकूनही पाहत नाही.

पुणे - शहरातील प्रमुख रस्ते सिमेंटचे करून जवळपास १५ वर्ष उलटून गेली आहेत, पण या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका ढुंकूनही पाहत नाही. एकीकडे डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविताना महापालिकेच्या नाकीनऊ आलेले असताना दुसरीकडे सिमेंट रस्त्याच्या ब्लॉकमध्ये पडलेल्या भेगा, पेव्हींग ब्लॉक व रस्ता समपातळीमध्ये नसल्याने दुचाकी घसरून पडत आहेत. पावसाळ्यात या भेगांचा भयंकर त्रास दुचाकीस्वारांना सहन करावा लागणार आहे.

महापालिकेने सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीचे नियोजन केले असले तरी त्यासाठी अजून किमान दोन महिने वाट पहावी लागेल.

डांबरी रस्त्यांना पडणारे खड्डे व दरवर्षी त्यावर देखभाल दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे पुणे महापालिकेने शहरातील प्रमुख मोठे रस्ते सिमेंटचे करण्याचा निर्णय घेतला. २००५ पासून महापालिकेने टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यास सुरवात केली. यामध्ये १२ मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांचाही समावेश आहे. सिमेंटचा रस्ता केल्याने ते पावसाळ्यात खराब होत नाहीत, खड्डे पडत नाहीत त्यामुळे या रस्त्यांचे आयुष्य जास्त असल्याचे सांगितले जाते.

महापालिकेने गेल्या १७ वर्षांत तब्बल ४०० किलोमीटरचे सिमेंटचे रस्ते तयार केले. यामध्ये सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, नगर रस्ता, बाणेर-बालेवाडी, औंध रस्ता, सिंहगड रस्ता, पौड रस्ता यासह इतर प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. पण हे रस्ते आता दुकाचीस्वारांसाठी धोकादायक झाले आहेत.

अपघाताचा धोका का?

  • सिमेंटच्या रस्त्याच्या एका बाजूने किमान तीन लेन असतात

  • एक लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाताना ब्लॉकमधील भेगांचे अंतर वाढले

  • अनेकदा लेन बदलताना त्यावरून दुचाकीस्वारांचे नियंत्रण जाते

  • ज्या दुचाकींचे चाक छोटे आहे, त्यांना यांचा जास्त त्रास होतो

  • पादचारी मार्ग आणि रस्ता यामध्ये पेव्हिंग ब्लॉक टाकलेले असतात, हे ब्लॉक आणि रस्ता एका पातळीत नसतो

  • रस्ता वर आणि ब्लॉक खाली असतो

  • अशा ठिकाणांवरून दुचाकी घसरून दुचाकीस्वार पडतात

  • सिमेंटच्या रस्त्याला आडवे तडे गेले आहेत तिथे दुरुस्ती केली जात नसल्याने त्यातील अंतरदेखील वाढत आहे

१४०० किमी शहरातील एकूण रस्त्यांची लांबी

९०० किमी डांबरी रस्ते

४०० किमी सिमेंट काँक्रीटचे रस्ते

१०० किमी विकसित न झालेले रस्ते

५,००० रुपये सिमेंट रस्ता तयार करण्याचा प्रति चौरस मीटर खर्च

३,५०० रुपये डांबरी रस्ता तयार करण्याचा प्रति चौरस मीटर खर्च

७,५०० रुपये पेव्हिंग ब्लॉक डक्टसह चौरस मीटर खर्च

या रस्त्यांवर केली जाणार दुरुस्ती...

  • सातारा रस्ता

  • सिंहगड रस्ता

  • नगर रस्ता

  • सोलापूर रस्ता

  • औंध रस्ता

  • कर्वे रस्ता

  • पौड रस्ता

  • बिबवेवाडी-कोंढवा रस्ता

  • बंडगार्डन रस्ता

  • जुना मुंबई-पुणे महामार्ग

  • गणेशखिंड रस्ता

  • बाणेर-बालेवाडी रस्ता

दुरुस्तीसाठी विशिष्ट रसायन

सिमेंट रस्त्याच्या जॉइंटमधील अंतर कमी करण्यासाठी फॉले सल्फाइड सिलेंट हे डांबरासारखे दिसणारे रसायन, तर सिमेंटचा रस्ता खचणे, तडे पडणे येथे दुरुस्तीसाठी ‘लो व्हिस्कॉसिटी इपोक्सी ग्राउट मॉर्टर’ हे सिमेंटचे विशिष्ट प्रकारचे रसायन वापरले जाते.

सिमेंट रस्त्यांच्या जॉइंटमध्ये पडलेल्या भेगा आणि रस्त्यांना तडे गेल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी पथ विभागाकडून पूर्व व पश्चिम विभागासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची निविदा काढली जाणार आहे. शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवर लवकरच काम सुरू केले जाईल.

- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग

काय करता येईल?

शहरातील सिमेंट रस्त्यांच्या सध्याच्या अवस्थेबद्दल आपल्याला आलेले अनुभव व स्थिती सुधारण्यासाठी सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com