राज्याकडून केंद्राला मिळणार २२ हजार कोटी

राज्याकडून केंद्राला मिळणार २२ हजार कोटी

पुणे - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर एक रुपया सेस व एक रुपया सीमा शुल्क वाढविल्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ होणार आहे. या वाढीमुळे एकट्या महाराष्ट्रातून सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा महसूल केंद्राला मिळणार आहे. 

पेट्रोल व डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित असतात, त्यामुळे त्यांचे दर रोज निश्‍चित होतात. देशात रात्री बारानंतर या दोन्हींचे दर बदलतात. आता त्या बदलणाऱ्या दरावर दोन रुपये वाढवून किंमत निश्‍चित केली जाणार आहे.

पुणे शहर पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी सुनील रुकारी यांनी सांगितले, की महाराष्ट्रात दरवर्षी ३५ हजार लाख लिटर पेट्रोल, तर ७५ हजार लाख लिटर डिझेलचा खप होतो. दोन रुपयांच्या वाढीतून केंद्र सरकारला पेट्रोलच्या माध्यमातून सुमारे सात हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे, तर डिझेलच्या खपातून सुमारे १५ हजार कोटी रुपये महसूल मिळणार आहे. २०१४ पूर्वी केंद्र सरकारकडून पेट्रोल- डिझेलवर दोन रुपये अधिभार लावण्यात आला होता. त्यांनतर केंद्रात सत्ताबदल झाला तेव्हा पुन्हा आठ रुपयांपर्यंत नेला. असे असताना आता पुन्हा नव्याने एक रुपया सेस आणि एक रुपया सीमा शुल्क केंद्र सरकारकडून वाढविण्यात आले आहे. देशात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा खप सर्वाधिक आहे. यावरून केंद्राच्या तिजोरीत राज्याच्या जनतेचे योगदान किती आहे, हे स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com