...आणि दारुच्या बाटलीत निघाली गोम ! 

पांडूरंग सरोदे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे : सोमवारची सकाळ उजाडताच त्यांची पावले आपोआप देशी दारुच्या दुकानाकडे वळली. खिशातील असेल-नसेल तेवढे पैसे जमा करुन त्यांनी देशी दारु मागितली. दुकानदारानेही त्यांची मागणी पुर्ण करत त्यांच्या हातात दारुच्या बाटल्या ठेवल्या. काही अंतरावर जाऊन त्यांनी एक दारुची बाटली उघडली, त्यातील दारु पिणार, तेवढ्यात त्यांना दारुच्या बाटलीमध्ये गोम दिसली. क्षणार्धात त्यांनी स्वतःला सावरले आणि ही खबर सगळीकडे पोचविली 

बिबवेवाडी येथील देशी दारुच्या दुकानामध्ये सोमवारी सकाळी काही मद्यपी दारु पिण्यासाठी गेले होते. त्यांनी दुकानदाराला पैसे दिले आणि दारुच्या बाटल्या हातात घेऊन दारु पिण्यासाठी ते काही अंतरावर गेले. त्यापैकी एकाने दारुच्या बाटलीचे झाकण उघडले आणि दारु पिण्याचा प्रयत्न करणार, तेवढ्यात त्याला त्यामध्ये काहीतरी असल्याचे दिसले. बारकाईने बघितल्यानंतर बाटलीमध्ये गोम असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने हा प्रकार आपल्या साथीदारांनाही दाखविला. हा प्रकार गंभीर असल्यामुळे त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठविण्याचे ठरविले. त्यानंतर या प्रकरणाबाबत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी प्रयत्न केला. 

महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये स्वच्छतेची कामे करणारे कामगारांना दारूमध्ये गोम असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, पोलिसांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यास सांगितले. मनसेचे अभिजीत टेंबेकर बिबववाडी  याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात व एक्साईज खात्यामध्ये गेले. परंतू बिबवेवाडी पोलीसांनी तक्रार घेतलेली नसून औषध अन्नधान्य प्रशासनाकडे तक्रार करण्यास सांगितले. टेंबेकर कार्यकर्त्यंसह एक्साईज खात्याकडे तक्रार दाखल करणार आहे.

Web Title: centipede found in alcohol bottle

टॅग्स