केंद्रीय प्रवेश समितीकडून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची तयारी सुरु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, तसेच पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी उद्‌बोधन वर्गाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, तसेच पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी उद्‌बोधन वर्गाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची नियमावली, अर्ज भरणे, अर्ज अप्रूव्ह करणे, तसेच मुख्याध्यापक आणि झोन समिती यांची जबाबदारी सांगण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, झोन अधिकारी यांचे प्रशिक्षण मंगळवारी (ता. 21) आयोजित केले आहे. दोन सत्रांत ते होणार आहे. कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ऍसेंब्ली हॉलमध्ये हे प्रशिक्षण होईल. 

दोन सत्रांत प्रशिक्षण 
पुणे शहर, कोथरूड-कर्वेनगर, पर्वती-धनकवडी-स्वारगेट, सिंहगड रस्ता, कॅंप-येरवडा या विभागांचे प्रशिक्षण मंगळवारी (ता. 21) दुपारी 12 ते दोन या वेळेत, तर हडपसर, शिवाजीनगर-औंध-पाषाण, पिंपरी-भोसरी, चिंचवड-निगडी या विभागांचे प्रशिक्षण याच दिवशी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत होईल. त्यासाठी झोनप्रमुख, झोन सहायक, पर्यवेक्षीय अधिकारी, झोननिहाय संपर्कप्रमुख, तंत्रसहायक आणि मुख्याध्यापकांची उपस्थिती बंधनकारक आहे. 

विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन 
अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि दोन कसा भरावेत, अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास कुणाशी संपर्क करावा, त्यातून मार्ग कसा काढावा, याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी झोननिहाय (क्षेत्र) उद्‌बोधन वर्गाचे आयोजन केले आहेत. 
उद्‌बोधन वर्गाचे वेळापत्रक 

अ.क्र. झोन ठिकाण दिनांक व वेळ
1 पुणे शहर राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सहकारनगर, पुणे 22 मे,
9 स. 11 ते 12 
2 सिंहगड रस्ता रावसाहेब पटवर्धन विद्यालय दांडेकर पूलाजवळ 22 मे 
दु. 1 ते 2 
3 शिवाजीनगर- मॉडर्न महाविद्यालय औंध-पाषाण शिवाजीनगर 22 मे 
दु. 3 ते 4 
4 हडपसर सी. बी. तुपे कन्याशाळा हडपसर 22 मे 
सायं. 5 ते 6 

 
5 पिंपरी-भोसरी म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी 22 मे 
स. 11 ते 12 
6 चिंचवड-निगडी म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी 22 मे 
दु. 3 ते 4 
7 पर्वती-धनकवडी- राजीव गांधी ई लर्निंग स्कूल स्वारगेट सहकारनगर 22 मे 
दु. 1 ते 2 

 
8 कॅंप-येरवडा नौरोसजी वाडिया महाविद्यालय टाटा ऍसेंब्ली हॉल 8. 23 मे 
स. 11 ते 12 
9 कर्वेनगर-कोथरूड कलमाडी हायस्कूल कर्वेरस्ता 23 मे 
दु. 3 ते 4 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central admissions committee has begun preparing for online access of XI