केंद्र सरकारकडून आयुष्मान सहकार निधी योजना जाहीर 

केंद्र सरकारकडून आयुष्मान सहकार निधी योजना जाहीर 

पुणे - कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी दहा हजार कोटी रुपयांची आयुष्मान सहकार निधी योजना जाहीर केली आहे. देशातील ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून ही विशेष योजना राबविण्यात येणार आहे. पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी ही नवीन योजना अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. 

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून आयुष्मान सहकार योजना राबविण्यात येणार आहे. एनसीडीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आगामी काही वर्षांत दहा हजार कोटींचे मुदतकर्ज सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे. सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या 52 रुग्णालयांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती एनसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक संदीप नायक यांनी दिली. या 52 रुग्णालयांमध्ये मिळून पाच हजार खाटांची सुविधा आहे. एनसीडीसीच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, परिचारिका शिक्षण, निमवैद्यकीय शिक्षण, आरोग्य विमा आणि आयुष अशा आरोग्य व्यवस्थेचाही यात समावेश असणार आहे. आयुष्मान सहकार योजना निधीमुळे सहकारी रुग्णालयांना वैद्यकीय आणि आयुष शिक्षण घेण्यासाठी मदत मिळणार आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आयुष्मान सहकार योजनेतून आरोग्यविषयक सेवा 
रुग्णालये, फिजिओथेरपी महाविद्यालय, योग कल्याण केंद्र, आयुर्वेद, ऍलोपॅथी, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी आरोग्यसेवा केंद्र, ज्येष्ठांसाठी आरोग्य दक्षता केंद्र, दिव्यांगांसाठी आरोग्य दक्षता केंद्र, मानसिक आरोग्य सेवा केंद्र, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, ट्रॉमा केअर, हेल्थ क्‍लब आणि जिम, आयुष औषधनिर्मिती, औषध चाचणी प्रयोगशाळा, दंत चिकित्सा केंद्र, नेत्रविकार केंद्र, प्रयोगशाळा, चाचणी सेवा, रक्तपेढी, पंचकर्म चिकित्सा केंद्र 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एनसीडीसी आयुष्मान सहकार योजना संकेतस्थळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com