मनुष्यबळ विकासमंत्र्यांचे 'पुराण' कथानक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पुणे : जगभरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारताकडे आकृष्ट कसे करावे, यासंबंधी डेस्टिनेशन इंडिया परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नेहमी प्रमाणे पुराणांचा राग आवळला. वेद, उपनिषद, चाणक्य, शुश्रुत या हजारो वर्षांपूर्वीच्या वैभवावरच ते बोलत होते. आधुनिक संशोधनाबद्दल मात्र त्यांचा अभ्यास कमी दिसला. देशाचे प्राचीन गतवैभव, ज्याच्या परंपरेत शेकडो वर्षाचा खंड पडला आहे, त्याचेच गोडवे मंत्रीसाहेब गात होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किवळे येथील सिम्बॉइसिस आंतराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (ICCR) आयोजन करण्यात आले आहे. 'आयसीसीआर'चे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे, कुलपती शां. ब. मुजुमदार आदि उपस्थित होते.

पोखरियाल संपूर्ण भाषणात भारताच्या गत वैभवाचे गोडवे गात, भारत विश्वगुरु असल्याचे भासवत होते. देशातील शैक्षणिक गुणवत्तेची ढासळलेली परिस्थिती, देशाबाहेर शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या, अभ्यासक्रमांची ढासळत दर्जा या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री साहेबांचा अभ्यास जरा कमीच दिसला. देशाला शिक्षणाच्या बाबतीत परम वैभवला न्यायाचे असतील तर मंत्री साहेबांनी पुराणांच्या अभ्यासातून वेळ काढून जरा वर्तमानातील शैक्षणिक परिषदेचा वास्तवशील अभ्यास करावा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central human resource minister speaks at Symbiosis Pune