केंद्रीय पर्यटनमंत्री के.जे. अल्फोन्स यांची किल्ले रायगडला भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पुणे : केंद्रीय पर्यटनमंत्री के.जे. अल्फोन्स यांनी आज किल्ले रायगडला भेट दिली. देशाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याचे योगदान महत्वपूर्ण असून शिवरायांनी इतक्या उंच पर्वतावर उभारलेली राजधानी पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 

"जगभरात अनेक किल्ले पाहीले परंतू रायगड किल्ला पाहिल्यावर मी अक्षरशः भारावून गेलो आहे. गडावर चाललेले उत्खननाचे काम पाहून समाधान व्यक्त केले. या उत्खननात मिळालेल्या सर्व वस्तू त्यांनी पाहील्या. गडाचा लष्करीदृष्ट्या अभ्यास, तसेच गडावर मिळालेल्या सर्व वस्तूचा अभ्यास करणे गरजेचे आहे. महाराजांचा इतिहास व महाराष्ट्रात असलेले गडकिल्ले यांचे चांगल्याप्रकारे सादरीकरण केल्यास, जगभरातला अभ्यासक रायगडाकडे आकर्षित होती." , अशी अशा त्यांनी व्यक्त केली

. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने झालेल्या या भेटीत गडाच्या पायथ्याला असलेल्या गावांचाही विकास करण्याबाबत चर्चा झाली.

Web Title: central tourism minister k. j. alfons visited the fort for raigad today