पुणे : शहारात भरदिवसा साखळी चोरट्यांचा धुमाकुळ (व्हिडिओ)

chain-snatching
chain-snatching

पुणे : शहरात सकाळी सकाळी साखळी चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून, एका पाठोपाठ सहा घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.  यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत फडके हौद येथे महिलेच्या गळ्यातील दीड तोळे तर लोखंडे तालिम येथे दोन तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले. ही घटना सकाळी साडे सातच्या सुमारास घडली.

वानवडी येथे जगताप चौकात दोन तोळ्याचे मंगळसुत्र तर समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३.३ तोळ्याचे दागिने लंपास केले. बिबवेवाडी परिसरात मानस अपार्टमेंट येथे सकाळी साडे नऊच्या सुमारास दीड तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरसीएम काॅलेज येथे सकाळी पावणे वाजता चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिलांना लक्ष करून चोरट्यांनी सलग पाच साखळी चोऱ्या केल्या. या घटनांची माहिती मिळताच पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. हे सर्व गुन्हे एकाच टोळीने केल्याची शक्यता आहे.

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com