मिरचीचा भाव घसरल्याने  चाकणला शेतकरी नाराज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

चाकण - येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुजरात राज्यातून सुमारे पाच टन मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीला एका किलोला फक्त सोळा ते अठरा रुपये भाव मिळाला. मिरचीचे भाव उतरल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. 

सध्या बाजारात दुष्काळी परिस्थितीमुळे स्थानिक हिरवी मिरची कमी प्रमाणात येत आहे. गुजरात, कर्नाटक या राज्यांतून हिरव्या मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. परराज्यातील हिरव्या मिरचीची आवक अधिक झाल्याने भाव गडगडत आहेत. 

चाकण बाजारात तरकारी, पालेभाज्या खरेदी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड, भोसरी, मावळ, खोपोली, पनवेल या भागातून खरेदीदार येत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात होते. याबाबत विक्रेते चांगदेव बोराटे यांनी सांगितले, की गुजरात राज्यातून हिरवी मिरची विक्रीसाठी आणली जात आहे. या मिरचीचे भाव चांगलेच घसरले आहेत.

Web Title: Chakan farmers are angry with the decline of chillies