चाकणला जुगार क्‍लबमधून ३० लाख लुटले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

चाकण - येथील चाकण-तळेगाव रस्त्यावर नाणेकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत एका अवैध जुगार पत्त्याच्या क्‍लबमध्ये, तसेच चाकण -आंबेठाण रस्त्यावरील झित्राईमळ्याजवळील एका जुगार पत्त्याच्या क्‍लबमध्ये तीन दिवसांपूर्वी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान निगडीतील वीस, पंचवीस जणांनी कोयते, तलवारी, दोन पिस्तुलाचा धाक दाखवून जुगार खेळणाऱ्या लोकांना जिवे मारण्याची धमकी देऊन दोन्ही जुगाराच्या क्‍लबमधून रोख तीस लाखांची लूट केली.   

चालकांच्या व जुगार खेळणाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, अंगठ्या, ब्रेसलेट, मोबाईल आदी चोरून नेले. पण पोलिसांत याची काहीच तक्रार नाही. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे यांनी सांगितले, की या प्रकाराची मला काही माहिती नाही. मी माहिती घेतो व चौकशी करतो. 

चाकणमध्ये पत्त्याचे  क्‍लब व मटका  राजेरोसपणे सुरू आहेत. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Chakan gambling club robbed of 30 million